Covovax trials finally begin in India

सिरमची दुसरी लस ‘कोव्होवॅक्स’च्या चाचण्या सुरू, ‘या’ महिन्यात येणार बाजारात

कोरोना देश पुणे

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी शनिवारी सांगितले कि, “आशा आहे की यावर्षी सप्टेंबरपर्यंत आमच्या कंपनीची कोविड -19 ची दुसरी लस बाजारात येईल. सिरम आणि यूएस वॅक्सीन डेव्हलपमेंट कंपनी नोव्हावाक्स यांनी बनवलेल्या कोव्होवॅक्स (Covovax) या दुसर्‍या लसीची चाचणी भारतात सुरू झाली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कोव्होवॅक्स ची आफ्रिकन आणि ब्रिटनच्या कोरोना स्ट्रेनविरुद्ध चाचणी घेण्यात आली असून त्यांची एकूण कार्यक्षमता ८९ % आहे, असे पूनावाला यांनी ट्विट केले.

वृत्तानुसार, यूकेमध्ये झालेल्या तीन टप्प्यातील ट्रायलमध्ये कोव्होवॅक्सने कोरोनाच्या मूळ स्ट्रेनविरुद्ध ९६ % कार्यक्षमता दर्शविली. परंतु यूके स्ट्रेनविरुद्ध त्याची कार्यक्षमता टक्केवारी ८६.3 आहे तर दक्षिण आफ्रिकेत घेण्यात आलेल्या २ टप्प्यातील ट्रायलमध्ये त्याची एकूण कार्यक्षमता 48.6 टक्क्यांपर्यंत खाली गेली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत