नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी भटक्या कुत्र्यांबाबत कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने दिल्ली-एनसीआरमधील सर्व भटक्या कुत्र्यांना तात्काळ पकडून त्यांचे निर्जंतुकीकरण करण्यास, त्यांना लसीकरण करून कायमस्वरूपी आश्रयस्थानात ठेवण्याचे निर्देश दिले. या निर्णयावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, “दिल्ली-एनसीआरमधून सर्व भटक्या कुत्र्यांना […]
टॅग: rahul gandhi
बेजबाबदार विधाने करू नका, सर्वोच्च न्यायालयाने सावरकरांविरुद्धच्या वक्तव्याबद्दल राहुल गांधींना फटकारले, समन्सला स्थगिती
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या विधानावर सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राहुल गांधी यांच्याविरुद्ध लखनौ न्यायालयाने जारी केलेल्या समन्सला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना बेजबाबदार विधाने करू नका असा इशाराही दिला. आजच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, […]
धक्कादायक! काँग्रेस कार्यकर्त्या हिमानी नरवाल यांचा मृतदेह सूटकेसमध्ये आढळला, पक्षाकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी
हरियाणा : हरियाणातील रोहतक शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे, ज्यामुळे राज्यात आणि देशभरात खळबळ उडाली आहे. काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्या, हिमानी नरवाल यांचा मृतदेह शनिवारी सकाळी एका निळ्या रंगाच्या सूटकेसमध्ये बस स्थानकाजवळ आढळला. ही घटना तात्काळ पोलिसांच्या निदर्शनास आली आणि तपास सुरू करण्यात आला आहे. शनिवारी, १ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास […]
राहुल गांधींना आत्मचिंतनाची गरज, राहुल गांधी यांच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
नागपूर : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी महाराष्ट्रातील मतदारांची आकडेवारी सादर करत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांनी महाराष्ट्रात लोकसंख्येपेक्षा अधिक मतदान झाल्याचे नमुद केले. राज्यातील मतदार यादीत केवळ पाच महिन्यांत ३९ लाख नवे मतदार समाविष्ट झाले, असा दावा राहुल गांधीनी केला. राहुल गांधींनी महाविकास आघाडीतील खासदार सुप्रिया […]
महाराष्ट्र निवडणूक निकालांमध्ये छेडछाड केल्याचा आरोप, राहुल गांधींची सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांच्यासोबत पत्रकार परिषद
नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी, शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी-एससीपी खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान राहुल गांधींनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. राहुल गांधी म्हणाले कि, आम्ही या टेबलावर महाराष्ट्रात गेल्या निवडणुका लढवलेल्या संपूर्ण विरोधी पक्षाचे प्रतिनिधित्व करत आहोत. आम्ही निवडणुकांबद्दल […]
लोकसभा अध्यक्षांच्या निवडीवर तृणमूल काँग्रेसचा आक्षेप, एकाने जरी मतविभाजनाची मागणी केली तरी मतविभाजन करावं लागतं, हाच नियम आहे – तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी
दिल्ली : लोकसभा अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचे के. सुरेश हेसुद्धा या पदाच्या शर्यतीत होते. परंतु, आवाजी मतदानात ओम बिर्ला यांची निवड झाली. दरम्यान, या निवडणुकीवर तृणमूल काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. सभागृहाबाहेर येऊन तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी माध्यमांशी संवाद साधून भाजपावर टीका केली आहे. अभिषेक बॅनर्जी म्हणाले, नियमानुसार […]
राहुल गांधी यांना लोकसभा सदस्यत्व पुन्हा बहाल, लोकसभा सचिवालयाकडून अधिसूचना जारी
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आज लोकसभा सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आले आहे. त्यासाठीची सर्व आवश्यक कागदपत्रे लोकसभेच्या सचिवालयाकडून सोमवारी पडताळून पाहण्यात आली. त्यानंतर खासदारकीबदद्ल अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर राहुल गांधींना लोकसभा सदस्यत्व परत मिळण्याची दारे खुली झाली आहेत. मार्च 2023 मध्ये त्यांना स्पीकर ओम बिर्ला यांनी […]
आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन भारत जोडो यात्रेत झाले सहभागी
राजस्थान : राजस्थानमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा बुधवारी 10 वा दिवस आहे. सवाईमाधोपूर येथील भदोती येथून बुधवारी भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली. आरबीआयचे माजी गव्हर्नर एन रघुराम राजन यांनीही बुधवारी भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला. राहुल गांधींची यात्रा आज दौसा जिल्ह्यात दाखल होणार आहे. सवाई माधोपूर येथील भदोती येथून भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली. […]
स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल
ठाणे : भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बाळासाहेबांची शिवसेना नेत्या वंदना डोंगरे यांनी तक्रार दाखल केली आहे. गांधी यांच्या वक्तव्यामुळे स्थानिक नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्याची तक्रार ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुरुवारी दाखल करण्यात आली. आयपीसी कलम 500, 501 अंतर्गत नॉन-कॉग्निझेबल (एनसीआर) […]
राहुल गांधींना ईडीसमोर हजर होण्यासाठी देण्यात आली नवी तारीख…
नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात चौकशीसाठी ईडीने राहुल गांधी यांना 13 जून रोजी हजर राहण्यासाठी नवीन समन्स जारी केले आहेत. त्यांना यापूर्वी 2 जून रोजी पदच्युत करण्यास सांगितले होते, परंतु केरळमधील वायनाड मतदारसंघातील लोकसभा सदस्याने ते देशाबाहेर असल्याने नवीन तारखेची मागणी केली होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, राहुल गांधी यांना आता 13 जून रोजी मध्य […]










