Chief Minister Devendra Fadnavis
नागपूर महाराष्ट्र

राहुल गांधींना आत्मचिंतनाची गरज, राहुल गांधी यांच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

नागपूर : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी महाराष्ट्रातील मतदारांची आकडेवारी सादर करत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांनी महाराष्ट्रात लोकसंख्येपेक्षा अधिक मतदान झाल्याचे नमुद केले. राज्यातील मतदार यादीत केवळ पाच महिन्यांत ३९ लाख नवे मतदार समाविष्ट झाले, असा दावा राहुल गांधीनी केला. राहुल गांधींनी महाविकास आघाडीतील खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार संजय राऊत यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सविस्तर आकडेवारी सादर करत निवडणूकीत गैरप्रकार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावर मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले कि, महाराष्ट्रात किती मतदार आणि कुठे वाढले हे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. दिल्लीमध्ये मोठा पराभव होणार असल्याने ते कव्हर फायरिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना माहित आहे दिल्लीत त्यांचा सुपडासाफ होणार आहे, म्हणून राहुल गांधीनी ही तयारी सुरु केली आहे. फडणवीस पुढे म्हणाले, मी वारंवार सांगतो, जोपर्यंत ते आत्मचिंतन करणार नाहीत आणि आपल्या मनाची समजूत काढून घेतील, तोपर्यंत जनतेचं समर्थन त्यांना कधीच मिळणार नाहीत. त्यांचा पक्ष देखील पुन्हा तग धरु शकणार नाही.

महाराष्ट्र निवडणूक निकालांमध्ये छेडछाड केल्याचा आरोप, राहुल गांधींची सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांच्यासोबत पत्रकार परिषद

महाराष्ट्र निवडणुकीचा आम्ही अभ्यास केला आहे. विधानसभा निवडणूकत २०२४ ते लोकसभा निवडणूक २०२४ पर्यंत महाराष्ट्रात ३९ लाख नव मतदारांचा समावेश झाला. या मतदार यादीमध्ये अनेक अनियमितता असल्याचे आढळून येते. लोकसंख्येपक्षा जास्त मतदार आहेत. विरोधी पक्षाला लोकसभेला जेवढी मते होती तेवढीच विधानसभेला मिळाली. दुसरीकडे भाजपला लोकसभेत १.९ लाख मतं मिळाली होती. तर विधानसभेत त्यांना १.७५ लाख मतं मिळाली. या तफावतीवर राहुल गांधींनी बोट ठेवले आणि हे वाढीव मतदार तयार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तर महाराष्ट्रात आमची मतं कमी झालेली नाहीत, भाजपाची वाढली आहेत, असे त्यांनी अधोरेखित केले असून निवडणूक आयोगाने मतदारांची फोटोंसह माहिती सादर करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत