नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आज लोकसभा सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आले आहे. त्यासाठीची सर्व आवश्यक कागदपत्रे लोकसभेच्या सचिवालयाकडून सोमवारी पडताळून पाहण्यात आली. त्यानंतर खासदारकीबदद्ल अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर राहुल गांधींना लोकसभा सदस्यत्व परत मिळण्याची दारे खुली झाली आहेत. मार्च 2023 मध्ये त्यांना स्पीकर ओम बिर्ला यांनी लोकसभेतून अपात्र ठरवले होते.