madhya pradesh khargone bus accident all passengers fell from the bridge 15 people died

५० फूट उंचावरुन बस कोसळली, १५ जणांचा जागीच मृत्यू

देश

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. बोराड नदीवरील पुलावरून एक प्रवासी बस तब्बल ५० फूट खाली कोसळली आहे. नदीत पाणी नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, १५ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, पोलीस आणि प्रशासनाकडून अद्याप १५ जणांच्या मृत्यूला दुजोरा मिळालेला नाही. मृतांचा आकडा २० पर्यंत वाढू शकतो. या अपघातात चालक, कंडक्टर आणि क्लिनरचाही मृत्यू झाल्याची माहिती समोल आली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी खरगोन येथील बस दुर्घटनेवर शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबियांसाठी हळहळ व्यक्त केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

बस क्रमांक MP10-P-7755 ही गाडी शारदा ट्रॅव्हल्सचं असल्याचं सांगण्यात येत आहे. ही ट्रॅव्हल्स खरगोनहून इंदौरला जात होती. खरगोन-ठीकरी मार्गावर हा अपघात झाला. बस नदीवरील पुलावरून जात असताना अचानक खाली कोसळली आणि मोठा आवाज झाला आणि गोंधळ झाला. बसमध्ये ३५ हून अधिक प्रवासी होते. दसंगा गावात हा अपघात झाला.

त्यानंतर गावकऱ्यांनी या अपघाताबाबत पोलिसांना माहिती दिली. गावकऱ्यांसह पोलीस कर्मचारी जखमींना मदत करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच आमदार रवी जोशी हेही घटनास्थळी रवाना झाले आहेत. घटनास्थळी पोहोचलेले आमदार रवी जोशी यांच्याशी संवाद साधला असता, गावकऱ्यांनी सांगितले की, बसेस दररोज भरधाव वेगाने जातात. अनेकवेळा आम्ही बसचालकांना अडवले, पण ते दादागिरी करतात.

खरगोन येथील बस अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपये, गंभीर जखमींना ५० हजार रुपये, किरकोळ जखमींना २५ हजार रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे. यासोबतच अपघातातील जखमींवर योग्य उपचाराची व्यवस्था राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत