crime
क्राईम देश

दिल्ली पुन्हा हादरली! तरुणीची भरदिवसा लोखंडी रॉडने वार करून हत्या, कॉलेजबाहेर घडली घटना

नवी दिल्ली : दिल्लीतील मालवीय नगर भागात शुक्रवारी भरदिवसा एका मुलीची हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरातील कमला नेहरू कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका मुलीवर कॉलेजच्या बाहेर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली, ज्यात तिचा मृत्यू झाला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

दरम्यान, आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू केला आहे. सध्या पोलिस कॉलेजमधील आणि आसपासच्या लोकांकडून माहिती गोळा करत आहेत. आरोपींना पकडण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत