Actor Sherman Joshi's father Arvind Joshi passes away
मनोरंजन

शर्मन जोशीचे वडील अभिनेते अरविंद जोशी यांचे निधन

बॉलिवूड अभिनेता शर्मन जोशीचे वडिल अरविंद जोशी यांचे आज पहाटे निधन झाले. मुंबईच्या जुहूस्थित नानावटी रूग्णालयात पहाटे 3 च्या सुमारास त्यांनी अंतिम श्वास घेतला. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा शर्मन जोशी व मुलगी मानसी जोशी असा परिवार आहे. मानसी ही सुद्धा अभिनेत्री असून अभिनेता रोहित रॉयची पत्नी आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अरविंद जोशी गुजराती रंगभूमी कलाकार आणि गुजराती नाट्यदिग्दर्शक म्हणून ओळखले जात होते. परंतु त्यांनी अनेक हिट सिनेमांत दमदार भूमिका साकारल्या होत्या. इत्तेफाक, शोले, अपमान की आग, खरीदार, ठीकाना अशा अनेक सिनेमांत त्यांनी सहाय्यक अभिनेता म्हणून भूमिका साकारल्या होत्या. अनेक हिंदी मालिकांमध्येही त्यांनी काम केले.

त्यांच्या निधनाने कलाविश्वात शोक व्यक्त केला जात आहे. अभिनेते परेश रावल यांनी अरविंद जोशी यांच्या निधनावर शोक व्यक्त करत ट्विट केले. अरविंद जोशी यांचे निधन ही भारतीय रंगभूमीची मोठी हानी आहे. एक हरहुन्नरी अभिनेता, एक मोठा नाट्यदिग्दर्शक, एक निर्मळ माणूस आपण गमावला, अशा शब्दांत त्यांनी दुःख व्यक्त केलं आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत