न्यूयॉर्क : कॅनेडियन अभिनेता ख्रिस्तोफर प्लमर यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले आहे. प्लमर यांना एक ऑस्कर पुरस्कार, दोन टोनी पुरस्कार आणि दोन एमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ख्रिस्तोफर यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये त्यांची 51 वर्षीय पत्नी एलेन टेलर त्याच्यासमवेत उपस्थित होती.
प्लमर यांनी सिनेमाच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट संगीत फिल्म ‘द साउंड ऑफ म्युझिक’ यात काम केले आहे. ख्रिस्तोफर यांना अजूनही ‘द साउंड ऑफ म्युझिक’ सिनेमातील कॅप्टन जॉर्ज वॉन ट्रॅपच्या भूमिकेत प्रेक्षक पसंत करतात. ख्रिस्तोफर यांनी आपल्या 70 वर्षांच्या कारकीर्दीत हॉलिवूड फिल्म जगतात अनेक भूमिका केल्या. 2012 मध्ये ‘बिगिनर्स’ चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला.
ऑस्कर पुरस्कार त्यांना वयाच्या 82 व्या वर्षी मिळाला. ‘बिगिनर्स’ चित्रपटात त्यांनी एक अशी भूमिका साकारली की ज्याला बर्याच वर्षानंतर वाटतं की आपण गे आहोत. याशिवाय त्यांनी शेक्सपियरने लिहिलेली अनेक पात्रे पडद्यावर उतरवली आहेत.




