farmers road blockade

राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर शेतकऱ्यांचे चक्का जाम आंदोलन, देशभर हाय अलर्ट

देश शेती

नवी दिल्ली : राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर दुपारी १२ ते ३ या वेळेत चक्का जाम आंदोलन करणार असल्याचे शेतकऱ्यांनी जाहीर केले. दुपारी तीन वाजता शेतकरी त्यांच्या वाहनांचे हॉर्न एक मिनिटासाठी वाजवून शेतकरी एकतेचे प्रदर्शन करतील. दिल्ली एनसीआर, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येथे आंदोलन करणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून राजधानी दिल्लीसह देशभर ‘हाय अलर्ट’ देण्यात आला आहे. पोलीस यंत्रणा सतर्क आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आंदोलनादरम्यान अँब्युलन्स, शाळांच्या बस तसेच अत्यावश्यक सेवेशी संबंधित वाहने अडवणार नाही, असे शेतकऱ्यांनी जाहीर केले. कोणत्याही प्रकारची हिंसा आणि नासधूस करणार नसल्याचेही शेतकऱ्यांनी जाहीर केले आहे.

शेतकऱ्यांशी मागील दोन महिन्यांत ११ वेळा चर्चा झाली आहे. अद्याप शेतकऱ्यांनी अथवा त्यांच्या कोणत्याही संघटनेने कृषी कायद्यांविषयीचा त्यांचा आक्षेप नेमकेपणा सांगितलेला नाही. काही दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलनप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळीही शेतकरी संघटना अथवा त्यांच्या वकिलाला आक्षेप नेमकेपणाने सांगता आले नाही. प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकार चर्चेला कायम तयार आहे. मात्र आंदोलन करणाऱ्यांनी कृषी कायद्यांविषयीचे त्यांचे आक्षेप सांगावे असे आवाहन केंद्र सरकारने केले. या आवाहनाला प्रतिसाद देण्याऐवजी शेतकरी संघटनांनी ‘चक्का जाम’ आंदोलन जाहीर केले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत