china
देश

अरुणाचल प्रदेशमधील ५ भारतीयांचं चिनी सैन्यानं अपहरण केल्याची माहिती

भारत आणि चीनदरम्यान तणावाचं वातावरण आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत भारताच्या २० जवानांना हौतात्म्य आलं होतं. तर भारतीय जवानांनी प्रत्युत्तर देत चीनच्या ४० जवानांना ठार केलं होतं. अजूनही एकीकडे चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे चीनकडून मात्र कुरापती सुरूच आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

दरम्यान, अरुणाचल प्रदेशमधील ५ भारतीयांचं चिनी सैन्यानं अपहरण केल्याचा दावा काँग्रेसचे आमदार निनाँग एरिंग यांनी केला आहे. त्यांनी आज यासंदर्भातील ट्विट करत माहिती दिली आहे. “सुबनसिरी जिल्ह्यातील ५ लोकांचं कथितरित्या पीएलएनं अपहरण केलं आहे. पाच महिन्यांपूर्वीही अशी घटना घडली होती,” असं एरिंग म्हणाले. पीएलए आणि चीनच्या कम्युनिस्ट पार्टीला याचं सडेतोड उत्तर दिलं गेलं पाहिजे, असंही ते म्हणाले. अपहरण करण्यात आलेल्यांची नावंदेखील दिली आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत