देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४० लाखांच्या पुढे गेली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि प. बंगालमध्ये करोनाबाधित रग्णांची संख्या वेगानं वाढत आहे.
आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात ८६ हजार ४३२ करोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे.त्यामुळे देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४० लाख २३ हजार १७९ झाली आहे. देशात आतापर्यंत ६९ हजार ५६१ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशात आतापर्यत ३१ लाख ७ हजार २२३ जणांनी करोनावर मात केली आहे.




