couple committed suicide in nanded by hanging

दुःखद : म्युकरमाकोसिसमुळे डोळा गमावलेल्या पोलिसाची आत्महत्या..

कोरोना नागपूर महाराष्ट्र

नागपूर  : नागपूर शहर पोलीस दलातील स्पेशल प्रोटेक्शन युनिट मध्ये कार्यरत आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रमोद मेरगुवार असे आत्महत्या करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचं नाव आहे. 46 वर्षीय प्रमोद यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. प्रमोद यांना म्युकरमायकोसिस आजार झाला होता. यामध्ये त्यांनी आपला डोळाही गमावला होता. तेव्हापासून प्रमोद नैराश्यात होते. झिंगाबाई टाकळी येथील निवासस्थानी प्रमोद यांनी शनिवारी दुपारी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडली, त्यामध्ये घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पोलीस कर्मचारी प्रमोद मेरगुवार यांनी काही दिवसांपूर्वी कोरोनावर मात केली होती. पण, त्यानंतर त्यांना म्युकरमायकोसिस या आजारेन ग्रासलं. यामध्ये एक डोळाही गमावावा लागला होता. तर दुसरा डोळा 80 टक्के कार्यरत नसल्याचं समोर आलं. एकूणच या परिस्थितीमुळे प्रमोद मेरगुवार नैराश्येत गेले होते. यातूनच प्रमोद यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. प्रमोद यांनी स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केल्याची माहिती समजताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करता इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) येथे रवाना करून तपास सुरू करण्यात आला आहे..

 

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत