PM narendra modi

‘सिंघम’ सारखा दिखावा करू नका, कर्तव्य पार पाडा- पंतप्रधान मोदी

देश

शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल पोलीस अकादमी येथे भारतीय पोलीस दलाच्या प्रशिक्षणार्थ्यांसमवेत दीक्षांत परेड सोहळ्याप्रसंगी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना आपले कर्तव्य करताना कोणत्याही गैरकृत्यात सामील होवू नका, असा सल्ला दिला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

नवीन ड्यूटी जॉईन केलेले काही अधिकारी ‘सिंघम’ सारख्या चित्रपटांपासून प्रभावित होतात आणि दिखावाच जास्त करतात. लोकांनी आपल्याला घाबरलं पाहिजे आणि समाजकंटकांनी आपलं नाव ऐकताच थरथर कापलं पाहिजे ही गोष्ट त्यांच्या डोक्यात फिट होते. आणि त्यामुळेच जी काही मुख्य कर्तव्य करायची असतात त्याकडे दुर्लक्ष होते, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, प्रशिक्षणार्थ्यांनी गणवेशाची शक्ती दाखवण्याऐवजी त्याचा अभिमान बाळगला पाहिजे. तुमच्या खाकी गणवेशाविषयीचा आदर कधीही गमावू नका. विशेषतः या कोविड-19 दरम्यान पोलिसांनी केलेल्या चांगल्या कामांमुळे खाकी वर्दीचा मानवी चेहरा सार्वजनिक आठवणीत कोरला गेला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत