Agricultural laws are beneficial to farmers - President

कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे, त्यांच्याविषयी गैरसमज पसरवण्यात आले – राष्ट्रपती

देश शेती

नवी दिल्ली : आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन सत्रांमध्ये चालणार आहे. पहिलं सत्र 15 फेब्रुवारीपर्यंत तर दुसरं सत्र 8 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत चालणार आहे. राष्ट्रपती म्हणाले की, “कोरोना महामारीच्या काळात होणारं हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचं आहे. नवीन वर्ष आणि नवं दशक आहे.”

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणासोबत आज बजेट सत्राची सुरुवात झाली. अभिभाषणाची सुरुवात करताना राष्ट्रपती म्हणाले की, “कोरोना, देशाच्या सीमा भागांतील तणाव यांसारख्या संकटांनंतरही देश एकजुटीने उभा आहे.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “आव्हान कितीही मोठं असलं तरीही आम्ही थांबणार नाही आणि भारतही थांबणार नाही.”

राष्ट्रपतींनी शेतकरी आंदोलन आणि 26 जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारावरही भाष्य केलं. ते म्हणाले की, “सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी प्रयत्न केले आहेत. पंतप्रधान किसान योजनेचा देशातील लहान शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात झाला आहे. संसदेने कृषी विधेयकं मंजूर केली असून यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तसेच 26 जानेवारी रोजी झालेला तिरंग्याचा अपमान ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे.”

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांचा 10 कोटी छोट्या शेतकऱ्यांना लाभ झाल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यावेळी बोलताना सांगितलं. “केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करेल. पूर्वीच्या कायद्यातील कोणत्याही सुविधा रद्द करण्यात आलेल्या नाहीत. कृषी कायद्यांविषयी गैरसमज पसरवण्यात आले आहेत. ते दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच सरकारने कृषीमालांना दीडपट हमी भाव दिला असून सरकारी खरेदी केंद्रही वाढवली असल्याचं राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत