मुंबई : सर्वसामान्य मुंबईकरांना ठाकरे सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. कोरोना परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती. मात्र १ फेब्रुवारीपासून लोकल सेवा सर्वांसाठी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्व नियोजन करून गर्दी होणार नाही, अशा वेळा आखून सर्व सामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा सुरु करण्यात येणार आहेत, याबाबतचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.




