two man gang raped his wife in front of husband incident in latur
क्राईम देश

भयंकर! पतीच्या मैत्रिणीवर बलात्कार करण्यासाठी महिलेने 5 जणांना हायर केले, बलात्काराचा व्हिडिओही बनवला…

हैदराबाद : हैदराबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने तिच्या पतीच्या प्रेमसंबंधाच्या संशयावरून पतीच्या मैत्रिणीवर बलात्कार घडवून आणला. महिलेला संशय आला होता की तिच्या पतीचे आपल्या महिला मैत्रिणीसोबत प्रेमसंबंध आहेत. त्यामुळे या महिलेने पतीच्या मैत्रिणीवर बलात्कार करण्यासाठी 5 जणांना हायर केले. त्यानंतर या ५ जणांनी त्या महिलेवर बलात्कार केला. एवढेच नाही तर महिलेने बलात्काराचा व्हिडिओही बनवला. ही घटना सायबराबादमधील गचीबोवली येथील आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी गायत्री या गुन्हेगार महिलेसह सहा जणांना अटक केली आहे. कोंडापूर येथील गायत्रीच्या घरात 5 जणांनी महिलेसोबत बलात्कार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायत्रीचा पती श्रीकांत युपीएससीची तयारी करत असताना पीडित महिलेला कोचिंगमध्ये भेटला होता. ही महिला अनेकदा गायत्रीच्या पतीला भेटण्यासाठी गायत्रीच्या घरी येत असे. त्यानंतर ऑक्टोबर 2021 ते फेब्रुवारी 2022 पर्यंत ती गायत्रीसोबत त्याच्याच घरी राहिली. यानंतर गायत्रीला तिच्या नवऱ्याचे महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय आला. बरेच वाद झाल्यानंतर ती महिला गायत्रीच्या घरातून निघून गेली होती.

26 मे रोजी गायत्रीने पीडित महिलेला तिच्या घरी बोलावले होते. इथे गायत्रीने आधीच भाड्याच्या 5 जणांना बोलावले होते. त्यानंतर या ५ जणांनी पीडितेवर बलात्कार केला. त्याचा व्हिडिओही बनवण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर पोलिसात गेल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देऊन पीडितेला सोडून देण्यात आले होते. पोलिसांनी सर्व गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. गायत्री या गुन्हेगार महिलेसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत