15 tourists stranded mid-air as cable car in Himachal develops glitch
देश

हिमाचलमध्ये केबल कारमध्ये बिघाड झाल्याने 11 पर्यटक हवेतच अडकले, सर्वांना वाचवण्यात यश

हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशातील सोलन खोऱ्यातील टिंबर ट्रेल परवानू येथे सोमवारी त्यांच्या दोन केबल कारमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ११ पर्यटक हवेतच अडकून पडले होते. त्यानंतर काही क्षणापुर्वी या सर्वांना वाचवण्यात यश आले आहे. बचाव उपकरणाच्या साहाय्याने प्रवाशांना खाली दरीत एका टेकडीवर उतरवले जात होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पर्यटकांना वाचवण्यासाठी दुसरी केबल कार ट्रॉली तैनात करण्यात आली. टिंबर ट्रेल ऑपरेटरचे तांत्रिक पथक तैनात करण्यात आले आणि पोलिसांचे पथक परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. दरम्यान, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी याबाबत ट्विट केले. ते म्हणाले, “सोलनच्या परवानू टिंबर ट्रेलमध्ये अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्याचे काम सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच मी स्वतः घटनास्थळी जात आहे. प्रशासन घटनास्थळी असून एनडीआरएफ आणि प्रशासनाच्या मदतीने लवकरच सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका केली जाईल.”

केबल कार हे टिंबर ट्रेल प्रायव्हेट रिसॉर्टचे वैशिष्ट्य आहे, चंदीगडपासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर आहे आणि संपूर्ण प्रदेशात लोकप्रिय आहे. हरियाणा, पंजाब आणि चंदीगडसह हिमाचल प्रदेशच्या सीमेवर हे स्थान आहे.

एप्रिलमध्ये, बाबा बैद्यनाथ मंदिराजवळील त्रिकुट हिल्स येथे रोपवेवर काही केबल कार आदळल्या होत्या. त्यावेळी त्या दुर्घटनेत काही जणांनी आपला जीव गमावला होता.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत