missile nag
देश

‘नाग’ या रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी यशस्वी

‘नाग’ या रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी यशस्वी ठरली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) आज सकाळी पोखरण आर्मी रेंजवर वॉरहेड वापरुन या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. चार किलोमीटर रेंज असलेले हे क्षेपणास्त्र खांद्यावरुन डागता येते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

नाग क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी होणे म्हणजे, चार किलोमीटर पर्यंतच्या अंतरासाठी भारताला आता इस्रायल, अमेरिकेकडून क्षेपणास्त्र आयात करण्याची गरज उरणार नाही.

१९ ऑक्टोबरला बालासोर टेस्ट रेंजवर स्टँड ऑफ अँटी टँक मिसाइलची चाचणी करण्यात आली होती. या क्षेपणास्त्राद्वारे १० किलोमीटर अंतरावरील रणगाडा उडवता येऊ शकतो. भविष्यात लढाऊ हेलिकॉप्टरवर हे क्षेपणास्त्र बसवण्यात येईल. पण तीन दिवसापूर्वीची चाचणी जमिनीवरुन करण्यात आली व ती यशस्वी सुद्धा ठरली. नाग क्षेपणास्त्राची आजची दहावी चाचणी यशस्वी ठरली. त्यामुळे लष्करात ‘नाग’ क्षेपणास्त्राचा लवकरच समावेश केला जाईल.

NAG missile

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत