Kamal Thoke

लागिर झालं जी मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके (जीजी) अनंतात विलीन; मराठी सिनेसृष्टीवर शोककळा

मनोरंजन

कराड : प्रसिद्ध मालिका लागिर झालं जी मधून कमल ठोके यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आणि माजी मुख्याध्यापिका श्रीमती कमल ठोके अशी त्यांची ओळख होती. त्या 74 वर्षांच्या होत्या. 14 नोव्हेंबरला संध्याकाळी बंगळुरू इथं त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी सिनेसृष्टीत जीजी अशी कमल ठोके यांची ओळख आहे. कलम यांच्या कराड इथल्या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या अशा जाण्यामुळे चाहत्यांनीही हळहळ व्यक्त केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, कमल ठोके हे गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाने आजारी होत्या. बंगळुरू इथं त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण अखेर 14 नोव्हेंबरला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. खरंतर, कमल यांचा अभिनयातील प्रवासही मोठा होता. 1992 मध्ये त्यांनी सिनेसृष्टीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. बरं इतकंच नाही, यावेळी त्या कराडमध्ये शिक्षिकादेखील होत्या. त्यांनी अनेक अजरामर भूमिका साकराल्या आहेत. त्यांच्या प्रत्येक पात्रं प्रेक्षकांच्या मनात भरली. बाबा लगीन, माहेरचा आहेर, सख्खा भाऊ पक्का वैरी, ना. मुख्यमंत्री गावडे अशा अनेक गाजलेल्या मराठी सिनेमांतून कमल यांनी आपला अभिनय लोकांपर्यंत पोहोचवला. अभिनयासोबतच कमल यांना शिक्षणाचीही ओढ होती. यामुळे त्यांनी जुद्दीने आपलं शिक्षण पूर्ण करत शिक्षिकेचंही काम केलं.

कमल ठोके यांचे पती गणपती ठोके हेदेखील शिक्षक आहे. गणपती ठोके यांनीही कायम कमल यांना त्यांची आवड-निवड जोपासण्यासाठी पाठिंबा दिला. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण कमल ठोके यांनी तब्बल 33 वर्ष शिक्षिका म्हणून नोकरी केली आहे. अशात त्यांनी अभिनय आणि संगिताची आवड कधीच मागे नाही राहू दिली. त्यांच्या जाण्यामुळे सगळ्यांच्याच मनाला चटका लागला आहे. संपूर्ण मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत