मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोनला कोरोनाची लागण झाली आहे. तिचे वडील प्रकाश पादुकोन, आई उजाला आणि बहिण अनिशा यांना या आधीच कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे दीपिकाची देखील कोरोना टेस्ट करण्यात आली, ती पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी दीपिका आणि रणवीर सिंह मुंबईहून बंगळुरूला आले होते.
दीपिकाचे वडील प्रकाश पादुकोण हे माजी बॅडमिंटनपटू आहेत. काही दिवसांपूर्वी दीपिकाच्या वडिलांसह तिची आई आणि बहीण अनिशा यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवल्याने त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्याने हे तिघेही स्वतः च्या राहत्या घरी विलगीकरणात होते. परंतु, काही दिवस उलटूनही प्रकाश यांचा ताप उतरला नाही तेव्हा त्यांना बंगळुरू मधील एका हॉस्पिटलमध्ये भरती केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर दीपिकाची आई आणि बहीण घरीच क्वारंटाईन आहेत. त्यातच आता दीपिकाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
दीपिकाने अलिकडेच कोरोनाच्या कठीण काळात मानसिक आरोग्याबाबत एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. तिने मानसिक आरोग्याच्या समस्येने ग्रासलेल्या लोकांसाठी काही हेल्पलाईन क्रमांक शेयर केले आहेत. जेणेकरून या काळात लोक एकाकीपणाची भावना बाळगणार नाहीत आणि आयुष्य संपविण्यासारखे कोणतेही पाऊल उचलणार नाहीत. तिने लिहिले होते कि, “आपल्यातील लाखो, अगदी मी आणि माझे कुटुंब एकमेकांपासून दूर संघर्ष करीत आहोत, आपण हे विसरता कामा नये की या सद्य परिस्थितीत आपली भावनिक काळजी तितकीच महत्त्वाची आहे. लक्षात ठेवा, आपण एकटे नाही आहात. या संकटात आपण सर्वजण एकत्र आहोत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आशा.”
View this post on Instagram




