Actor Asif Basra commits suicide

अभिनेते आसिफ बसरा यांनी केली आत्महत्या

मनोरंजन

अभिनेते आसिफ बसरा यांनी आत्महत्या केली आहे. आसिफ बसरा यांचा मृतदेह हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा येथील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. मात्र आसिफ यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अभिनेते आसिफ बसरा हे गेल्या पाच वर्षांपासून मॅक्लोडगंजमध्ये एका मैत्रिणीसोबत भाडे तत्त्वावर घेतलेल्या घरात राहत होते. त्यांची मैत्रिण परदेशी असून ते दोघे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असल्याचे म्हटले जाते. त्यांनी आशिकी २, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, ब्लॅक फ्रायडे, काय पो चे अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत