मुंबई : द डर्टी पिक्चर या चित्रपटातली अभिनेत्री आर्या बॅनर्जी हिचा मृत्यू झाला असून तिचा मृतदेह तिच्याच अपार्टमेंटमध्ये संशयास्पद परिस्थितीत आढळून आला आहे. आर्याचा मृतदेह तिच्या दक्षिण कोलकाताच्या जोधपूर पार्कमधील फ्लॅटमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. आर्याच्या मृत्यूच्या कर्णाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चौकशी चालू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तिच्या मोलकरणीने तिला फोन केला होता. परंतु आर्याने फोन न उचलल्याने तिला संशय आला आणि तिने पोलिसांना याबाबतची सूचना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दरवाजा तोडून फ्लॅटमध्ये दाखल झाले. रिपोर्ट्सनुसार आर्याच्या नाकातून रक्त आले होते आणि तिने उलटीही केली होती. पोलिसांनी आर्याचे शव शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. आर्या बॅनर्जीचे खरे नाव देवदत्ता बॅनर्जी आहे.