Ind vs eng: Joe Root collapsed on the field as he could not bear the pain
क्रीडा

Ind vs eng : जो रुट वेदना सहन न झाल्याने मैदानावर कोसळला आणि विराट मदतीला धावला..

चेन्नई : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात सध्या पेटीएम कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. कर्णधार जो रुट यानं आपल्या १०० व्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी शतकी खेळी करत इंग्लंड संघाला अश्वासक सुरुवात करुन दिली आहे. रुटच्या शतकी खेळीच्या बळावर इंग्लंडनं पहिल्या दिवशी तीन बाद २६३ धावांपर्यंत मजल मारली. मात्र त्यात एक घटना क्रिकेट हा जंटलमनचा गेम असल्याचं दाखवून देणारी ठरली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा कर्णधार जो रुट यांच्यामध्ये घडलेली ही घटना आहे. पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसातील तिसऱ्या सत्रामध्ये 87 व्या ओव्हरवेळी जो रुटचा पाय दुखू लागला. वेदना सहन न झाल्याने तो मैदानावर कोसळला. हे पाहून विराट कोहली जो रुटच्या मदतीला धावला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत