नवी दिल्ली : देशात पेट्रोल-डिझेलचे दर दिवसागणिक वाढत आहेत. गुरुवार आणि शुक्रवार सलग दोन दिवस तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. तेलाव्यतिरिक्त एलपीजी सिलेंडरच्या किंमतीही वाढल्या आहेत. सरकारने सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ केली आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या वाढत्या किंमतींवरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत सरकारवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी म्हणाले की, मोदी सरकारने देश आणि घर दोन्हींचे बजेट बिघडवले आहे.
मोदी सरकार ने बजट बिगाड़ दिया-
देश और घर, दोनों का! pic.twitter.com/6GPrNwFuPm— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 6, 2021




