IPL 2020 Match 55 DC vs RCB : दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धची मॅच ६ विकेट राखून जिंकली. या विजयामुळे मुंबई इंडियन्स पाठोपाठ दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या टीम आयपीएल २०२० स्पर्धेच्या ‘प्ले ऑफ’मध्ये दाखल झाल्या. अजिंक्य रहाणे (६०) आणि शिखर धवन (५४) यांनी केलेल्या अर्धशतकांमुळे दिल्लीच्या संघाने विजय मिळवत गुणतालिकेत दुसरं स्थान पटकावलं.
That’s that from Match 55.@DelhiCapitals win by 6 wickets and book the No.2 spot in #Dream11IPL 2020 Points Table. pic.twitter.com/QGkcH0TNtF
— IndianPremierLeague (@IPL) November 2, 2020
प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूचा सलामीवीर जोशुआ फिलीप १२ स्वस्तात बाद झाला. विराट २९ धावा करून माघारी परतला. त्यानंतर पडीकलने डीव्हिलियर्सच्या साथीने भागीदारी करत डाव सावरला. पडीकलने ५० धावा केल्या. डीव्हिलियर्सने फटकेबाजी केली आणि ३५ धावा करून बाद झाला. त्यामुळे संघाला १५२ पर्यंतच मजल मारता आली. दिल्लीकडून एनरिक नॉर्येने ३, कगिसो रबाडाने २ तर अश्विनने १ बळी टिपला.
We have the three qualifiers for #Dream11IPL 2020.
Who will take the vacant spot? pic.twitter.com/6PkxK6nzsa
— IndianPremierLeague (@IPL) November 2, 2020