भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पांड्यानंतर आता स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि के गौतम यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मंगळवारी कृणाल पांड्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, दीपक चहर, मनीष पांडे, ईशान किशन आणि के गौतम यांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. या आठ भारतीय खेळाडूंना शेवटच्या दोन भारत विरुद्ध श्रीलंका टी -२० सामन्यांमध्ये भाग न घेण्यास सांगण्यात आले होते.
कोरोना संक्रमित झालेले तीन खेळाडू आता लगेच भारतात परतू शकणार नाहीत. तर उर्वरित भारतीय टीम आज संध्याकाळी उशिरा भारतासाठी रवाना होईल. यात क्रुणालच्या संपर्कात आलेल्या हार्दिक पंड्या, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, दीपक चहर आणि ईशान किशन 6 खेळाडूंचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंचा कोरोना अहवाल RT-PCR चाचणीमध्ये निगेटिव्ह आला आहे.




