भारतीय क्रिकेटपटू कुलदीप यादवने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. परंतू त्याने लस घेतल्याचा फोटो जेव्हा सोशल मीडियावर टाकला, तेव्हा वेगळीच चर्चा सुरु झाली असून नवा वाद निर्माण झाला आहे. फिरकीपटू कुलदीप हॉस्पिटलऐवजी गेस्ट हाऊसच्या लॉनमध्ये लस घेताना दिसून आला. त्यामुळे हे प्रोटोकॉलचे उल्लंघन आहे.
कुलदीपने लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर फोटो शेअर केला आणि ट्वीट करत म्हटलं कि, “जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा ताबडतोब लस घ्या. सुरक्षित राहा कारण कोरोनाविरुद्ध लढ्यात एकत्र येण्याची गरज आहे.”
जब भी मौका मिले तुरंत टीका लगवाएं। सुरक्षित रहें क्योंकि covid19 के खिलाफ लड़ाई में एकजुट होने की आवश्यकता है ?? pic.twitter.com/6YSHyoGmWM
— Kuldeep yadav (@imkuldeep18) May 15, 2021
कुलदीपचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. कुलदीपला अशाप्रकारे लॉनमध्ये बसून कोरोना लस कशी दिली? याबाबत कानपूर जिल्हाधिकारी आलोक तिवारी यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी अतुल कुमार यांना या प्रकरणाची चौकशी करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
कुलदीपचे ते ट्वीट पाहून अनेकजण म्हणाले की पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनाही रूग्णालयात जाऊन लस घ्यावी लागते. अशा परिस्थितीत कुलदीपने प्रोटोकॉल का मोडला?




