महिला टी -२० चैलेंज आजपासून सुरू होत आहे. पहिला सामना शारजाह येथे सायंकाळी ७.३० वाजल्यापासून हरमनप्रीत कौरच्या सुपरनोव्हाज आणि मिताली राजच्या व्हेलॉसिटी या संघांत होणार आहे.
यापूर्वी 2019 मध्ये दोन्ही संघ दोन वेळा आमनेसामने आले होते. लीग सामन्यात सुपरनोव्हाजने व्हेलॉसिटीचा 12 धावांनी पराभव केला होता. दोन संघांदरम्यान झालेल्या अंतिम सामन्यात, सुपरनोव्हाजने व्हेलॉसिटीवर 4 गडी राखून विजय मिळविला होता.
सुपरनोव्हाजकडून सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत जेमिमा रॉड्रिग्स प्रथम आणि हरमनप्रीत कौर दुसर्या क्रमांकावर आहे. रॉड्रिग्जने ३ सामन्यात सर्वाधिक १२3 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर हरमनप्रीतने 3 सामन्यांत 98 धावा केल्या आहेत. सुपरनोव्हाज साठी सर्वाधिक विकेटच्या बाबतीत अनुजा पाटील आणि राधा यादव ३ – 3 विकेटसह पहिल्या क्रमांकावर आहेत. त्याचबरोबर पूनम यादव 2 विकेटसह दुसर्या क्रमांकावर आहे.
व्हेलॉसिटीच्या डेनिले व्हाईटने आपल्या संघासाठी 3 सामन्यांमध्ये सर्वाधिक 89 धावा केल्या आहेत. यानंतर कर्णधार मिताली राजचा नंबर येतो, तिने 3 सामन्यात 69 धावा केल्या आहेत. व्हेलॉसिटी संघात सर्वाधिक विकेटच्या बाबतीत एमिलिया केर पहिल्या आणि शिखा पांडे दुसर्या क्रमांकावर आहेत. एमिलिया केरने 3 सामन्यात 6 फलंदाज बाद केले. तर शिखाने 3 सामन्यांत २ विकेट घेतल्या आहेत.
शारजाहमधील खेळपट्टी फलंदाजांना मदत करू शकते. येथे स्लो विकेटमुळे स्पिनर्सनाही खूप मदत होईल. नाणेफेक जिंकणार्या संघाला प्रथम फलंदाजी करायला आवडेल.