India Vs Australia 1st ODI: India lose by 66 runs in the first ODI against Australia
क्रीडा

India Vs Australia 1st ODI : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या वन डे मॅचमध्ये भारताचा ६६ धावांनी पराभव

AUS vs IND : पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला ६६ धावांनी पराभव पत्करावा लागला. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या पहिल्या वन डे मॅचमध्ये टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाने ५० ओव्हरमध्ये ६ बाद ३७४ धावा केल्या. भारताची सुरुवात आश्वासक झाली नाही. शिखर धवन आणि हार्दिक पंड्या यांनी भागीदारी करत डाव सावरला परंतु त्यांचे प्रयत्न संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

India Vs Australia 1st ODI : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलं 375 धावांचं लक्ष्य

जोश हेझलवूडने भारताला सुरुवातीला तीन धक्के दिले. हेझलवूडने पहिल्यांदा सलामीवीर मयांक अगरवालला २२ धावांवर असताना बाद केले. त्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली हेझलवूडच्या उसळत्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. हेझलवूडच्या याच षटकातील पाचव्या चेंडूवर श्रेयस अय्यरने २ धावा करत आपली विकेट गमावली. लोकेश राहुलही १२ धावा करून बाद झाला. भारताची १४व्या षटकात ४ बाद १०१ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर सलामीवीर शिखर धवन आणि हार्दिक पंड्या यांनी चांगली भागीदारी केली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी १२८ धावांची महत्वाची भागीदारी रचली. पण ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झॅम्पाने धवनला बाद केले. धवनने १० चौकारांच्या मदतीने ७४ धावा केल्या. धवन बाद झाल्यावर काही वेळातच हार्दिकही बाद झाला. पंड्याने ७६ चेंडूंत सात चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ९० धावांची खेळी केली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत