राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपल्याला अंमलबजावणी संचनालयानं (ED) नोटीस पाठवल्याचा खुलासा खुलासा केला आहे. ED ची नोटीस मिळाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरातून मला जे फोन येत आहेत. त्यातून मोठी सहानुभूती व्यक्त केली जात आहे. लोकांना असं वाटत आहे की सतत चौकशी करणं हा एक प्रकारचा माझावर अन्याय होत आहे, अशी प्रतिक्रिया देखील एकनाथ खडसे यांनी दिली आहे.
एकनाथ खडसे यांना ED नोटीस बजावल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र, कालपासून एकनाथ खडसे यांनी याबाबत काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. एकनाथ खडसे यांनी अखेर आपल्याला नोटिस मिळाल्याचा खुलासा केला आहे. मात्र याव्यतिरिक्त काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला.