मंदिरं आणि धार्मिकस्थळं लोकांसाठी सुरू व्हावीत, रोहित पवार यांनी ट्विटरवरून ही मागणी केली आहे. त्यावर परिसरातील अनेक व्यावसायिकांची रोजीरोटी अवलंबून आहे. शिवाय लोकांच्या धार्मिक भावनाही असतात. त्याबाबत मी जरूर पाठपुरावा करेन, असं रोहित यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यात काल दिवसभरात १२ हजार ६१४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यात सध्या १ लाख ५६ हजार ४०९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
पर्युषण पर्व काळात मंदिरं खुली करण्याची याचिका जैन समुदायाकडून कोर्टात सादर करण्यात आली होती. त्यावर राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रं सादर करून मंदिरं खुली करता येणार नसल्याचं म्हटलेलं असतानाच रोहीत पवार यांनी मंदिरे खुली करण्याची मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रोहित यांच्या या मागणीला कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.




