Six Shivshahi buses caught fire in ST bus depot in Satara
महाराष्ट्र

साताऱ्यात बस डेपोमध्ये सहा शिवशाही बसला भीषण आग

सातारा : साताऱ्यात एसटी बस डेपोमध्ये सहा शिवशाही बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. एका तरुणाने पार्क असलेल्या बसला आग लावली. ही आग पसरली आणि शेजारी उभ्या असलेल्या इतर पाच बसने देखील पेट घेतला. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

दरम्यान बसला आग लावणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. परंतु त्याने आग का लावली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आगीत सहा गाड्या जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे. पोलीस दलही घटनास्थाळी पोहोचलं आहे. शिवशाही बस जळून खाक झाल्याने मोठं नुकसान झालं आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत