बीड : बीड जिल्ह्यात शुक्रवारी भीषण अपघात घडला, जेथे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एका डिझेल टँकरला स्फोट होऊन मोठी आग लागली. ही आग इतकी प्रचंड होती की संपूर्ण परिसर धुराने आणि ज्वाळांनी व्यापला होता. बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा येथील सीमेवर असलेल्या पाली घाटातील कोलवाडी फाट्यावर हा स्फोट झाला. टँकर उलटल्यानंतर, टँकर घसरला आणि मोठ्या प्रमाणात डिझेल रस्त्यावर […]
टॅग: fire
मरीन ड्राइव्हवर दोन कारची जोरदार धडक, भीषण अपघातानंतर दोन्ही वाहनांनी घेतला पेट
मुंबई : शुक्रवारी रात्री मरीन ड्राइव्ह परिसरात दोन कारमध्ये झालेल्या भीषण अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली. हा अपघात रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास झाला. टक्कर इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांनी पेट घेतला आणि काही वेळातच परिसरात धुराचे लोट पसरले. दरम्यान, अचानक झालेल्या या घटनेमुळे स्थानिकांमध्ये घबराट निर्माण झाली. तथापि, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी […]
पुणे : धायरीतील डीएसके चौकात इलेक्ट्रिक स्कूटरला आग
पुणे : पुण्यातील धायरी येथील डीएसके चौकात एका इलेक्ट्रिक स्कूटरला अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या टीमने तत्काळ घटनास्थळी पोहोचत आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, पण परिसरातील नागरिकांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाली आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अग्निशमन दलाच्या आगमनापूर्वी परिसरात दाट धूर दिसत होता, ज्यामुळे भीतीचे वातावरण […]
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृहात आग, विद्यार्थ्यांनी व्यक्त केली चिंता
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृहात १ एप्रिलच्या रात्री आग लागली. यात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. विद्यापीठाच्या कार्यकारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांनी सांगितले की, मुलांच्या वसतिगृह क्रमांक ८ मध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी अग्निशमन उपकरणांच्या मदतीने काही वेळातच आग विझवली. गेल्या महिन्यात विद्यापीठ परिसराजवळील जंगलात आग लागली होती […]
पुणे : केशव नगर परिसरातील तीन दुकानांमध्ये आग, सुदैवाने जीवितहानी टळली
पुणे : मंगळवारी, २५ मार्च २०२५ रोजी सकाळी ९:२३ वाजता पुणे शहरातील लोणकर चौकाच्या केशव नगर परिसरातील तीन दुकानांमध्ये आग लागली. या आगीमुळे परिसरात गोंधळ उडाला, मात्र अग्निशमन दलाच्या तत्काळ आणि प्रभावी प्रतिसादामुळे आग अधिक पसरली नाही आणि मोठा अनर्थ टळला. घटनास्थळी त्वरित पोहोचलेल्या हडपसर अग्निशमन केंद्र आणि बीटी कवडे रोड अग्निशमन केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी आग […]
पुणे : अवैधरित्या गॅस रिफिलिंग करताना मोठे स्फोट होऊन भीषण आग, चार स्कूल बस जळून खाक
पुणे : पिंपरी-चिंचवडमधील ताथवडे येथील जेएसपीएम महाविद्यालयाजवळ एका गॅस टँकरला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीनंतर मोठे स्फोट होऊन हवेत आगीचे लोट पसरू लागल्याने लोकांची पळापळ सुरू झाली. आगीत तीन ते चार स्कूल बस जळून खाक झाल्या आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या विभागाने पुष्टी केली आहे की ताथवडेमध्ये अनधिकृतपणे प्रोपीलीन गॅसचे रिफिलिंग हे […]
मोठी दुर्घटना! नाशिकमध्ये खासगी बसला भीषण आग; दहा प्रवाशांचा होरपळून मृत्यू
नाशिकः नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे. मिरची चौकात पहाटेच्या सुमारास खासगी बसला अचानक आग लागली. ही आग इतकी भयंकर होती की संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी या अपघाताची पुष्टी केली आहे. ही बस यवतमाळहून […]
एअर इंडियाच्या विमानाच्या एका इंजिनमध्ये लागली आग, सर्व प्रवासी सुरक्षित
नवी दिल्ली : कोचीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात आज एका इंजिनमध्ये आग लागल्याचे आढळून आल्यानंतर ते रिकामे करण्यात आले. ओमानमधील मस्कत विमानतळावर टेकऑफच्या आधी हा प्रकार घडला. सर्व क्रू आणि 145 प्रवासी, यांना विमानातून बाहेर काढण्यात आले आणि टर्मिनल इमारतीत हलवण्यात आले. यात चार लहान बाळांचा समावेश आहे. कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. नागरी उड्डाण […]
फ्रीजने पेट घेतल्याने वाड्याला आग लागली, अरुंद रस्त्यामुळे बचावकार्यात अडथळे…
आळंदी : खेड तालुक्यातील आळंदी देवाची येथे घरातील फ्रीजने पेट घेतल्याने संपूर्ण वाड्याला आग लागली. ही दुर्घटना मंगळवारी (१२ एप्रिल) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. यात वाड्याचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत जवळपास तीन सिलिंडरचा स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार, माउलींच्या मंदिरापासून जवळच जुन्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था इमारतीजवळ असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर धर्मशाळाजवळ राहणाऱ्या मुकुंद […]
ब्रेकिंग! मुंबई विमानतळावर विमानाच्या पुश बॅक ट्रॉलीला आग, विमानातील सर्व ८५ प्रवासी सुरक्षित
मुंबई : मुंबई विमानतळावर सोमवारी मोठा अपघात टळला. येथे एअर इंडियाच्या विमानाच्या पुश बॅक ट्रॉलीला आग लागली होती. टोइंग वाहनाला आग लागली तेव्हा विमानात 85 लोक होते. सुदैवाने या आगीमुळे विमान आणि त्यातील प्रवाशांचे कोणतेही नुकसान झाले नाही. आज दुपारी १ वाजेदरम्यान V26R स्टँडवर हा अपघात झाला. पुश बॅक ट्रॉलीला लागलेल्या आगीचे कारण अद्याप समजू […]










