Fire at the Serum Institute building
पुणे महाराष्ट्र

सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आग, अग्निशमन दलाचे आग विझवण्याचे प्रयत्न सुरु

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आग लागली आहे. सीरम इन्स्टिट्यूटमधील एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर ही आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मांजरी येथील याच ठिकाणी कोव्हिशिल्ड लसीचं उत्पादन केलं जात होतं. आग लागलेल्या इमारतीपासून जवळच प्रोडक्शन प्लांट असल्याची माहिती मिळत आहे. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून […]

Chief Minister Uddhav Thackeray
देश

भंडारा आग प्रकरण अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी; रुग्णालयांच्या सुरक्षेशी अजिबात तडजोड चालणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत निष्पाप 10 बालकांचा मृत्यू होणं ही अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना आहे. यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश मी दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे. सध्याच्या काळात राज्यभरातली आरोग्य यंत्रणा, सर्व रुग्णालये कोरोनाशी लढत आहेत मात्र रुग्णालयाच्या […]

A 10-year-old girl was burnt alive by a man and jumped into the fire
देश

१० वर्षीय मुलीला जिवंत जाळून मांत्रिकानेही मारली आगीत उडी, दोघांचा मृत्यू

राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यातील भाखारसर पोलीस स्टेशन अंतर्गत सुजो का निवान गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका मांत्रिकाने अल्पवयीन मुलीला आगीत जिवंत जाळून स्वतः देखील त्या आगीत उडी मारल्याने या दोघांचा मृत्यू झाला. मांत्रिकाचे नाव किस्तूराराम असून तो सहा वर्षांपूर्वी पाकिस्तानातून आला होता. ज्या मुलीला मांत्रिकाने जाळले तिचे वय १० वर्षे होते. मृत मुलीच्या वडिलांनी […]

Daund Railway station fire
महाराष्ट्र

ब्रेकिंग : दौंड रेल्वे स्टेशनवरील उपहारगृहात लागली आग, क्षणार्धात भडका झाला…

दौंड : दौंड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवरील फुडीज प्लाझा या उपहारगृहात सायंकाळी ५ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास मोठी आग लागली, क्षणार्धात त्याचा भडका झाला परंतु सुदैवाने आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली. आगीची झळ रेल्वे स्थानकाच्या पत्र्याला बसली आणि पत्र्यावर ठेवलेल्या पुठ्ठ्याच्या रिकाम्या खोक्यांना आग लागल्याने आग पसरली. उपहारगृह चालकाकडे आग विझविण्यासाठीचे उपकरण […]

Tharmacole Factory In Nalasopara
महाराष्ट्र मुंबई

थर्माकोल कंपनीला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही

मुंबई : नालासोपारा पूर्वेतील पेल्हार जाबरपाडा येथे थर्माकोलच्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग इतकी भीषण आहे की त्यामुळे कंपनी असलेल्या संपूर्ण परिसरात धुराचे प्रचंड लोळ पहायला मिळत आहे. या लागलेल्या आगीत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसून मोठ्या प्रमाणात सामान जळून खाक झाले आहे. पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबात राष्ट्रीय महामार्गावर नालासोपारा फाट्याजवळ ही […]