Tharmacole Factory In Nalasopara
महाराष्ट्र मुंबई

थर्माकोल कंपनीला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही

मुंबई : नालासोपारा पूर्वेतील पेल्हार जाबरपाडा येथे थर्माकोलच्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग इतकी भीषण आहे की त्यामुळे कंपनी असलेल्या संपूर्ण परिसरात धुराचे प्रचंड लोळ पहायला मिळत आहे. या लागलेल्या आगीत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसून मोठ्या प्रमाणात सामान जळून खाक झाले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबात राष्ट्रीय महामार्गावर नालासोपारा फाट्याजवळ ही थर्माकोल कंपनी आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण कळू शकलेलं नाहीये. या आगीमुळे कंपनीतील सामान जळून खाक झाले असून मोठी वित्तहानी झाल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत