IPL 2020 : MI vs DC मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर ९ गडी राखून विजय मिळवला आहे. प्ले-ऑफचं तिकीट मिळवलेल्या मुंबईने दिल्लीवर मात करत इतर संघांसाठीची शर्यत अधिक रंगतदार केली आहे. दिल्ली कॅपिटल्सने दिलेले १११ धावांचे आव्हान मुंबई इंडियन्सने १४.२ ओव्हरमध्येच पूर्ण केले. मुंबईने १ विकेट गमावून १११ धावा केल्या आणि मॅच ९ विकेट राखून जिंकली. या विजयामुळे मुंबईचे १८ पॉइंट्स झाले.
मुंबई इंडियन्सने धावांचा पाठलाग करताना छान सुरुवात केली. सलामीला आलेल्या इशान किशन आणि क्विंटन डी कॉक या जोडीने ६८ धावांची भागीदारी केली. डी कॉक २६ धावा करुन एनरिच नॉर्टजेच्या चेंडूवर क्लीनबोल्ड झाला. यानंतर इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी शेवटपर्यंत विकेट जाणार नाही याची काळजी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. सलामीवीर इशार किशनने ४७ चेंडूत आठ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावार नाबाद ७२ धावा केल्या. सूर्यकुमारने नाबाद १२ धावा केल्या. शनदार अर्धशतक झळकावणारा इशान किशन मॅन ऑफ द मॅच झाला.
An emphatic win for @mipaltan as they beat #DC by 9 wickets.@ishankishan51 with an unbeaten knock of 72.
Scorecard – https://t.co/8MWEaoY1Qn #Dream11IPL pic.twitter.com/nSydSGOkii
— IndianPremierLeague (@IPL) October 31, 2020
कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दिल्लीची ही जोडी फोडण्यासाठी कर्णधार पोलार्डने राहुल चहरला संधी दिली. चहरनेही आपल्या लेगस्पिनच्या जाळ्यात दिल्लीच्या कर्णधाराला अडकवत संघाला मोठं यश मिळवून दिलं. यानंतर दिल्लीच्या डावाला लागलेली गळती थांबलीच नाही. बुमराह, चहर, बोल्ट, कुल्टर-नाईल यांनी एकामागोमाग एक दिल्लीला धक्के देणं सुरु ठेवलं. स्टॉयनिस, ऋषभ पंत, हर्षल पटेल, शेमरॉन हेटमायर यांनीही फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात आपल्या विकेट फेकल्या. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी ३-३ तर कुल्टर-नाईल आणि चहर यांनी १-१ बळी घेतला.