आयपीएलचा 47 वा सामना दुबईत सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज सायंकाळी ७.30 वाजता होणार आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हैदराबादला हा सामना जिंकावा लागणार आहे. दिल्ली कॅपिटल्स हा सामना जिंकून प्ले-ऑफमध्ये आपले स्थान निश्चित करू शकेल.
हैदराबाद संघाने हंगामात आतापर्यंत 11 पैकी केवळ 4 सामने जिंकले असून 8 गुणांसह 7 व्या क्रमांकावर आहे. अशा स्थितीत प्ले ऑफ मध्ये पोहोचण्यासाठी त्यांना उर्वरित तीनही सामने जिंकावे लागतील. तरीही त्यांना अन्य संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल.
दुबईतील खेळपट्टी फलंदाजांना मदत करू शकेल. स्लो विकेट असल्यामुळे फिरकीपटूंनाही खूप मदत होते. नाणेफेक जिंकणार्या संघाला प्रथम फलंदाजी करायला आवडेल.
सनरायझर्स हैदराबादचा 52.52% इतका सक्सेस रेट आहे. हैदराबादने आतापर्यंत एकूण 119 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 62 सामने जिंकले आहेत आणि 57 गमावले आहेत. दिल्लीचा सक्सेस रेट 44.89% आहे. दिल्लीने आतापर्यंत एकूण १88 सामने खेळले आहेत, त्यामध्ये त्यांनी ८३ सामने जिंकले आणि १०3 गमावले आहेत. 2 सामने अनिश्चित होते.