IPL २०२० : सनरायजर्स हैदराबादच्या टीमने 14.1 ओव्हर्समध्ये पाच विकेट्स गमावत बंगळुरूवर विजय मिळवला आहे.हैदराबादचा ओपनर बॅट्समन डेव्हिड वॉर्नर हा अवघ्या आठ रन्सवर आऊट झाला. यानंतर वृद्धीमान सहा आणि मनिष पांडे या दोघांनी टीमला सावरत चांगली पार्टनरशिप केली. मनिष पांडे 26 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर साहा सुद्धा 39 रन्सवर आऊट झाला. यानंतर केन विल्यम्सन सुद्धा आठ रन्स करुन माघारी परतला. मग, जेसन होल्डर याने दमदार बॅटिंग करत टीमला विजय मिळवून दिला.
Match 52. It’s all over! Sunrisers Hyderabad won by 5 wickets https://t.co/CLIIZwApll #RCBvSRH #Dream11IPL #IPL2020
— IndianPremierLeague (@IPL) October 31, 2020
वृद्धिमान साहा आणि मनिष पांडे यांनी हैदराबादचा डाव सावरला. त्यांनी ३२ चेंडूत ५० धावांची भागीदारी केली. मनिष पांडे २६ धावांवर बाद झाला. पाठोपाठ साहा ३९ धावांवर बाद झाला. त्यानंतर केन विल्यमसन ८ आणि अभिषेक शर्मा ८ झटपट माघारी परतले. पण जेसन होल्डरने नाबाद २६ धावा केल्या.
A 5-wicket win and two crucial points in the bag for @SunRisers ??#Dream11IPL pic.twitter.com/rsuO6svtVx
— IndianPremierLeague (@IPL) October 31, 2020
बंगळुरूच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये सात विकेट्स गमावत अवघे 120 रन्स केले आणि सनरायजर्स हैदराबाद समोर विजयासाठी 121 रन्सचं आव्हान दिलं.बंगळुरूच्या टीमकडून जोश फिलिप याने 31 बॉल्समध्ये 32 रन्स केले. एबी डिव्हिलियर्सने 24 रन्स, वॉशिंग्टन सुंदरने 21 रन्स, गुरकीरत मन सिंग याने 15 रन्स केले. विराट कोहली सात रन्स, देवदत्त पड्डीकल पाच रन्स तर क्रिस मॉरिस तीन रन्सवर आऊट झाला.