Daund Railway station fire

ब्रेकिंग : दौंड रेल्वे स्टेशनवरील उपहारगृहात लागली आग, क्षणार्धात भडका झाला…

महाराष्ट्र

दौंड : दौंड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवरील फुडीज प्लाझा या उपहारगृहात सायंकाळी ५ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास मोठी आग लागली, क्षणार्धात त्याचा भडका झाला परंतु सुदैवाने आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आगीची झळ रेल्वे स्थानकाच्या पत्र्याला बसली आणि पत्र्यावर ठेवलेल्या पुठ्ठ्याच्या रिकाम्या खोक्यांना आग लागल्याने आग पसरली. उपहारगृह चालकाकडे आग विझविण्यासाठीचे उपकरण पुरेसे नव्हते. आग लागली तेव्हा पुणे-गोरखपूर ही एक्सप्रेस फलाट क्रमांक दोन वर उभी होती. आग वाढू लागल्याने एक्सप्रेस मधील प्रवासी आणि फलाटावरील लोक गोंधळले होते.

रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक तेजप्रकाश पाल यांच्यासह रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तातडीने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. स्थानकावर विविध ठिकाणी असलेले अग्निशामक उपकरणांचा वापर करून आणि पाण्याचा मारा करून आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यानंतर स्थानकावरील भीती आणि गोंधळाचे वातावरण निवळले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत