Pakistan is looking for new ways to send terrorists to India
देश

दहशतवाद्यांना भारतात पाठविण्याकरिता पाकिस्तान घेत आहे नव्या मार्गांचा शोध

भारताविरूद्ध पाकिस्तानच्या कुरापती नेहमी सुरु असतात. दहशतवाद्यांना भारतात आणण्यासाठी पाकिस्तान आता जम्मू-काश्मीर आणि पंजाब व्यतिरिक्त आता राजस्थान आणि गुजरातमधून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहे. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अलिकडच्या काळात घुसखोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

BSF च्या अधिकाऱ्यांनी दावा केला आहे कि, दहशतवाद्यांना भारतात पाठविण्याकरिता पाकिस्तान वेगवेगळ्या मार्गांचा शोध घेत आहे. आमचे सैनिक पूर्णपणे सतर्क आहेत आणि 24 तास सीमेवर निगराणी करत आहेत. ते म्हणाले की, बीएसएफ आपल्या जवानांची पोझिशन इंटेलिजन्स इनपुटनुसार सतत अपडेट करत राहतात.

यावर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 11 घुसखोरीच्या घटना घडल्याचे बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जम्मू, काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातला लागून असलेल्या सीमेवर ही घुसखोरी करण्यात आली. यावर्षी जम्मू आणि पंजाब सीमेवरुन सर्वाधिक घुसखोरीच्या घटना घडल्या आहेत.

नोव्हेंबर महिन्यात जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफने दीडशे मीटर लांबीचा बोगदा शोधून काढला होता आणि एका घुसखोरालाही ठार केले होते. बीएसएफचे IG एनएस जामवाल म्हणाले होते की आंतरराष्ट्रीय सीमेवर हा बोगदा शोधल्यामुळे हे स्पष्ट होते की पाकिस्तानी सैन्य दहशतवाद्यांना मदत करत आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत