मुंबई : रत्नागिरी येथील वाटद, झाडगाव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रात २९ हजार ५५० कोटीं गुंतवणुकीच्या दोन प्रकल्पांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. यामुळे ३८हजार १२० इतकी रोजगार निर्मिती होणार आहे. उच्च तंत्रज्ञानावर आधारित या गुंतवणुक प्रकल्पांमध्ये सिलीकॉन वेफर्स, एटीएमपी, फॅब आणि अवकाश तंत्रज्ञान (एरोस्पेस) आणि संरक्षण या क्षेत्राशी संबंधित आहेत. मुख्यमंत्री शिंदे […]
टॅग: Chief Minister Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुनर्वसित इर्शाळवाडीला भेट, पुनर्वसित विद्यार्थ्यांना नोकरी तर महिलांना देणार रोजगार
रायगड : इर्शाळवाडी दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. सिडकोमार्फत या दरडग्रस्तांच्या 44 घराचे बांधकाम हे अंतिम टप्प्यात आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आणी कामाचा आढावा घेतला. येत्या काही दिवसात या घराचा ताबा संबंधित कुटुंबाला देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पुणे दौरा आटोपून मुंबईकडे जात असताना मुख्यमंत्री […]
वन नेशन-वन इलेक्शन निर्णयाचे स्वागतच – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना क्रांतिकारी आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. बळकट लोकशाही असलेल्या भारतातील निवडणूक प्रक्रिया या संकल्पनेमुळे आणखी प्रभावी आणि मतदारांसाठी सोयीची ठरेल, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने देशात एक देश-एक निवडणूक या संकल्पनेला मंजूरी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी ही […]
मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात छत्रपती संभाजीनगर येथे राजश्री उंबरे यांचे उपोषण सुरू असून त्यांच्यावतीने सात सदस्यांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने सादर केलेल्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यावेळी उपस्थित होते. दरम्यान, पालकमंत्री अब्दुल सत्तार, मंत्री केसरकर यांनी उपोषणकर्त्या राजश्री उंबरे यांची भेट घेवून […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठीच्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल
मुंबई : पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. जागतिक कृषी परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे. एनसीपीए येथे 20 देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाचे औचित्य साधत 18 सप्टेंबर रोजी […]
इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत महाराष्ट्र अग्रेसर राज्य होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पुणे, पनवेल येथे १ लाख १७ हजार २२० कोटी रुपये गुंतवणुकीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित ४ विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाची मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. या प्रकल्पांमुळे सुमारे २९ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. आज मान्यता दिलेल्या प्रकल्पांमुळे राज्यात सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रीक वाहन निर्मितीमध्ये […]
मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाचे ताबडतोब पंचनामे करावेत, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
मुंबई : विशेषतः मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यासह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या विदर्भासह इतर भागातील जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. पिकांचे झालेले नुकसान, घरांची पडझड, पशुधनाची हानी अशा सर्व बाबींची माहिती घेण्यात यावी, त्वरित पंचनामे करण्यात यावेत. अतिवृष्टीमुळे तात्पुरते स्थलांतर केलेल्या […]
निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत संवेदनशीलपणे उपाययोजना करणार, मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश
मुंबई : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय – रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत सर्वंकष आढावा घेण्यात यावा. त्यासाठी राज्यस्तरावर, तसेच मुंबई शहरातील महाविद्यालयांच्या समन्वयासाठी पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवास व्यवस्था, वसतिगृह उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावेत. या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे विद्यावेतन नियमितपणे मिळेल, असे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज […]
ठाणे लोकसभेची जागा राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना यश
ठाणे : ठाणे लोकसभेची जागा राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना यश आलं आहे. ठाण्याची जागा शिवसेनाच लढणार असल्याची माहिती मिळाली आहे. लोकसभेसाठी आमदार प्रताप सरनाईक, माजी महापौर नरेश म्हस्के आणि मीनाक्षी शिंदे यांची नावं चर्चेत आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवसेनेत फूट पडल्यानंतर खासदार राजन विचारे अद्यापही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. विचारे […]
शासनाचे जनहिताच्या कार्याला नेहमी प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अमरावती : राज्य शासन ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील तळागळातील सर्व घटकांना विविध योजनांचा थेट लाभ मिळवून देत आहे. शासन जनहिताच्या कार्याला नेहमी प्राधान्य देत आहे व पुढेही देत राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. हनुमान चालीसा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित अमरावती येथील हनुमान गढी येथे प्रसिद्ध कथा वाचक पंडीत प्रदीप […]