lost of smell and taste good symptoms of corona patient
कोरोना तब्येत पाणी

दिलासादायक : कोरोनात चव न लागणं आणि वास न येणं हे चांगलं लक्षण, संशोधनातून समोर आली माहिती

मुंबई : काही जणांना कोरोना झाल्यानंतर वास आणि चव जाणं अशा प्रकारची लक्षणं जाणवतात. कोरोना संसर्गामुळे चव आणि वास घेण्याची क्षमता जाते. सर्वच कोरोना रुग्णांमध्ये हे लक्षण असेलच असं नाही. पण ज्या रुग्णांमध्ये अशी लक्षणं दिसत आहेत, त्यांच्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे. चव न लागणं आणि वास न येणं असं लक्षण असणं म्हणजे तुम्हाला गंभीर स्वरूपाचा कोरोना नाही. तुम्हाला रुग्णालयात दाखल होण्याची गरज पडत नाही.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कोरोना संक्रमित लोकांसाठी ही एक दिलासा देणारी बातमी आहे. ज्यांना वास आणि चव जाणं अशा प्रकारची लक्षणं जाणवतात, असे रूग्ण गंभीर धोक्यापासून दूर राहतात. जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजमध्ये 220 रुग्णांवर केलेल्या संशोधनात हे उघड झाले आहे.

संशोधक डॉ. हरेंद्र कुमार सांगतात की संशोधनासाठी दोन प्रवर्ग तयार केले गेले. यामध्ये, एका प्रवर्गात असे रूग्ण होते ज्यांना चव आणि वास येत नव्हता. तर दुसऱ्या प्रवर्गात चव आणि वास येत असणारे रुग्ण होते. या दोन प्रवर्गांचा तुलनात्मक अभ्यास केला गेला. तेव्हा असे दिसून आले की चव व वास न येणारे बहुतेक रुग्ण सामान्य औषधे आणि घरगुती विलगीकरणात बरे झाले. ते 10 ते 15 दिवसांत कोरोना निगेटिव्ह देखील झाल्याचे आढळले. तथापि, चव आणि वास न येण्याची तक्रार काहींमध्ये दीड महिन्यांपर्यंत राहिली. वास आणि चव न येणाऱ्या 9 जणांना तर वास आणि चव येणाऱ्या ३४ जणांना रुग्णालयात दाखल व्हावं लागलं.

डॉ. हरेंद्र कुमार सांगतात की तपासणी दरम्यान असे आढळले की नाकात सापडलेल्या घाणेंद्रियाच्या ग्रंथीवर कोरोनाने जबरदस्त हल्ला केला होता. परंतु, त्यामुळे कोरोना विषाणू तिथेच राहिला आणि तो मेंदूच्या दिशेने किंवा फुफ्फुसात जाऊ शकला नाही. अशा परिस्थितीत मेंदू आणि श्वसन प्रणाली सुरक्षित राहते आणि रूग्ण तीव्र ऑर्गन फेल्युअरपासून वाचतात.

डॉ. अमोल अन्नदाते यांनी देखील आपल्या युट्यूब चॅनेलमधून अशाच प्रकारची माहिती दिली आहे.

डॉ. अमोल अन्नदाते म्हणाले, “ज्या रुग्णांमध्ये अशी लक्षणं असतात ते फार गंभीर नसतात. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज फार भासत नाही. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी फार कमी होत नाही आणि त्यांच्या फुफ्फुसांवर या आजाराचा परिणाम कमी होतो. त्यामुळे कोरोना संक्रमित असाल आणि अशी लक्षणं असेल तर खरंतर तुमच्यासाठी हा दिलासा आहे. पण याचा अर्थ असा नाही ही तुम्ही दुर्लक्ष करायला हवं. ऑक्सिजनची पातळी सातत्याने तपासत राहायला हवी.”

वास आणि चव घेण्याच्या क्षमतेवर परिणाम झाल्यावर ही क्षमता परत येईल का नाही अशी भीती लोकांमध्ये असते. पण रुग्ण पूर्ण बरा झाल्यानंतर वास आणि चव या दोन्ही गोष्टी पुन्हा सुरळीत होतात.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत