No Need For Strict Lockdown In Pune says Mayor murlidhar mohol

पुण्यात लॉकडाऊनची गरज आहे का? महापौर मुरलीधर मोहोळ यांचं मोठं विधान..

कोरोना पुणे महाराष्ट्र

पुणे : पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता कडक लॉकडाऊनचा विचार करावा, अशा सूचना मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या नेतृत्वात होत असलेल्या बैठकीत शहरात पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मात्र यावर नाराजी व्यक्त केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

हायकोर्टाने सादर केलेली आकडेवारी आणि राज्य सरकार सांगत असलेली आकडेवारी यामध्ये तफावत असून याविरोधात आम्ही कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याचं मोहोळ यांनी म्हटलं आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत आहे. गेल्या आठवड्याभरात १६ हजाराच्या संख्येने अॅक्टिव्ह रुग्ण कमी झाले. पुणे शहरात सध्या 39 हजार कोरोना रुग्ण असल्याची माहिती आहे. पण कोर्टात ती १ लाख दाखवली जात आहे. त्यामुळे यात नेमकी तफावत कशी याबद्दल माहिती मिळणं आवश्यक असल्याचं मोहोळ यांनी सांगितलं.

महापौर मोहोळ म्हणाले की पुण्यात आधीच लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामध्ये फक्त ७ ते ११ यावेळेत दुकानं उघडतात. त्यामुळे आणखी वेगळ्या कडक लॉकडाऊनची गरज नाही. त्यामुळे आता या बैठकीत अजित पवार नक्की काय निर्णय घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत