senior journalist shesh narain singh died due to corona
कोरोना देश

ज्येष्ठ पत्रकार शेष नारायण सिंह यांचं कोरोनाने निधन, पंतप्रधानांनी केलं दुःख व्यक्त

ज्येष्ठ पत्रकार शेष नारायण सिंह यांचं आज (७ मे) कोरोनामुळे निधन झालं. शेष नारायण सिंह यांच्यावर ग्रेटर नोएडामधील जीआयएमएस रुग्णालयात उपचार सुरू होते. कालच त्यांना प्लाझ्मा थेरपी देखील देण्यात आली होती, परंतु त्याचा काही परिणाम झाला नाही. आज सकाळी त्यांचं निधन झालं.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

शेष नारायण सिंह हे मूळचे उत्तर प्रदेशमधील सुलतानपूरचे होते. गेली अनेक वर्षे ते हिंदी पत्रकारितेत योगदान देत होते. शेष नारायण सिंह यांचं निधन हिंदी पत्रकारितेसाठी मोठं नुकसान आहे. त्यांच्या निधनानंतर मीडिया जगतात शोककळा पसरली असून अनेक ज्येष्ठ पत्रकार आणि राजकारणी त्यांना श्रद्धांजली अर्पण करीत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शेष नारायण सिंह यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. ते म्हणाले कि, “ज्येष्ठ पत्रकार शेष नारायणसिंह जी यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. पत्रकारितेच्या जगात त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांची ओळख होती. या दुःखाच्या क्षणी मी त्यांच्या कुटुंबियांसोबत आहे. ओम शांती!

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत