Ajit Pawar Called An Important Meeting On Strict Lockdown In Pune

पुण्यात कडक लॉकडाऊन होणार? न्यायालयाच्या सूचनेनंतर अजित पवारांनी बोलावली बैठक

कोरोना पुणे महाराष्ट्र

पुणे : पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे कडक लॉकडाऊनचा विचार करावा, अशा सूचना मुंबई उच्च्य न्यायालयाने राज्य सरकारला दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात होत असलेल्या बैठकीत शहरात पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अजित पवार यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पुण्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवरून उच्च्य न्यायालयाने चिंता व्यक्त केली होती. तसंच कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने कडक लॉकडाऊनचा विचार करावा, असंही न्यायालयाकडून सांगण्यात आलं होतं. पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात होत असलेल्या या बैठकीला अजित पवार यांच्यासह विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकारी, तसंच पुणे शहराचे महापौर उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला अनेक दिवस लोटले आहेत, तरीदेखील रुग्णांची संख्या फारशी कमी होत नसल्यामुळे सरकारकडून कडक लॉकडाऊनचा विचार केला जाऊ शकतो. पुण्यात अजूनही अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत असल्यामुळे या महत्त्वपूर्ण बैठकीत नेमका काय निर्णय होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत