पणजी : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने संपूर्ण लॉकडाउनची घोषणा केली आहे. गोवा सरकारने आज घोषणा केली आहे की उद्या (गुरुवार) सायंकाळपासून राज्यात लॉकडाउन लागू करण्यात येईल.
गोव्यामध्ये 29 एप्रिल रोजी संध्याकाळपासून 3 मे रोजी सकाळपर्यंत संपूर्ण लॉकडाउन असणार आहे. लॉकडाऊन दरम्यान फक्त अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यास परवानगी दिली जाईल, अशी घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की लॉकडाऊन दरम्यान फक्त आवश्यक सेवा आणि औद्योगिक कामकाज चालविण्यास परवानगी दिली जाईल. लॉकडाऊन दरम्यान कॅसिनो, हॉटेल आणि पब बंद राहतील, तर आवश्यक सेवांच्या वाहतुकीसाठी निर्बंध असणार नाहीत.
LIVE: Press Conference of CM Dr Pramod Sawant https://t.co/2jq29JWf9Y
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) April 28, 2021
गोव्यात एका दिवसात 2110 नवीन कोरोना रुग्ण सापडले आणि ३१ जणांच्या मृत्यूची नोंद झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. गोवा राज्यात आतापर्यंत कोरोनाचे एकूण 81,908 रुग्ण आढळले असून मृतांचा आकडा 1,086 झाला आहे. त्यापैकी 64,२3१ रुग्ण बरे झाले असून एकूण १६५९१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. गोव्यात आतापर्यंत 6,32,131 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.




