youtuber arrested for making dog fly using balloons
देश

YouTuber गौरव शर्माला अटक, कुत्र्याला हायड्रोजन बलून बांधून हवेत सोडल्याप्रकरणी कारवाई

दिल्ली : दिल्लीतील एक YouTuber गौरव शर्माने अलीकडेच त्याच्या पाळीव कुत्र्याचा एक व्हिडिओ बनवला होता. त्यात त्याने त्याच्या पाळीव कुत्र्याला अनेक हायड्रोजन बलून बांधून हवेत सोडले होते. आता या युट्युबरला या व्हिडिओवरून अटक करण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आरोपी गौरवने त्याच्या गौरव झोन या यूट्यूब चॅनलसाठी एक व्हिडिओ बनविला होता, ज्यामध्ये तो आपल्या पाळीव कुत्र्यासह दिल्लीतील एका पार्कमध्ये दिसला. गौरवने त्याच्या कुत्र्याला अनेक हायड्रोजन बलून बांधून थोड्यावेळ हवेत सोडून दिले होते. गौरवची आईदेखील या व्हिडिओमध्ये सहभागी होती. हा व्हिडिओ त्याने यूट्यूबवर शेअर केला होता, परंतु नंतर प्राणी हक्क संघटनांच्या तक्रारी आल्यानंतर तो व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरून काढून टाकण्यात आला.

पीपल फॉर अ‍ॅनिमल (PFA) च्या सदस्यांनी व्हिडिओ समोर आल्यानंतर आणि हा मुद्दा उपस्थित केला आणि गौरव याच्याविरूद्ध दिल्लीच्या मालवीय नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. गौरव आणि त्याच्या आईवर प्राण्यांवर क्रूरतेच्या आरोपाखाली कलम 188, 269, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मूळ व्हिडिओ हटवल्यानंतर, गौरवने नंतर आपल्या यूट्यूब चॅनेलवर दुसरा व्हिडिओ रीलिझ केला. त्यात त्याने मागील व्हिडिओ का हटवावा लागला हे स्पष्ट केले. नवीन व्हिडिओमध्ये त्याने म्हटले की त्याने संबंधित व्हिडिओ बनवताना सर्व खबरदारीच्या उपाययोजना केल्या होत्या.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत