Army chopper crashes in Jammu and Kashmir's Bandipora
देश

ब्रेकिंग! काश्मीरमधील बांदीपोरा येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, बचावकार्य सुरू

काश्मीर : काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझच्या तुलईल भागात शुक्रवारी दुपारी लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. गुरेझ खोऱ्यातील गुजरन नाला परिसरात गस्त घालत असणारे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, त्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. अचानक बिघाड झाल्याने हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळत आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

तथापि, हेलिकॉप्टर क्रूच्या बचावासाठी सुरक्षा दलांची शोध पथकं या भागात पोहोचत आहेत. एसडीएम गुरेझ यांनी सांगितले की, अपघातापूर्वी हेलिकॉप्टरशी संपर्क तुटला होता. यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे. वैमानिक आणि सह-वैमानिक यांचा शोध घेण्याचे काम सुरु असून ते या अपघातातून सुखरूप बाहेर पडल्याचे मानले जात आहे, परंतु अधिका-यांकडून अद्याप याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत