शिकागो : हॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता केव्हिन क्लार्क यांचे अपघातात निधन झाले आहे. 32 वर्षीय केविन क्लार्क बुधवारी पहाटे शिकागोच्या रस्त्यावर सायकलवरून चालले होते, त्यावेळी त्यांना एका कारने धडक दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी केव्हिन यांना गंभीर परिस्थितीत अॅडव्होकेट इलिनॉय मेसोनिक मेडिकल सेंटरमध्ये दाखल केले. तेथे थोड्या वेळात त्यांना मृत घोषित करण्यात आले.
अभिनेता केव्हिन क्लार्कच्या निधनाने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. अभिनेता जॅक ब्लॅकने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. जॅक ब्लॅकने इंस्टाग्रामवर लिहिले की, “भयंकर बातमी … केविन इतक्या लवकर निघून गेला आहे, यावर विश्वास ठेवू शकत नाही. केविन आणि जॅक 2003 मध्ये ‘स्कूल ऑफ रॉक’मध्ये एकत्र दिसले होते.
View this post on Instagram
गायक केव्हिनच्या मृत्यूप्रकरणात धक्कादायक खुलासा, गॅलरीत मॉडेलबरोबर करत होता रोमान्स तेवढ्यात…




