Pearl V Puri Case Rape Victim Father Says His Daughter Told The Name Of The Actor

पर्ल पुरीने ‘त्या’ मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप खरा, पीडितेच्या वडिलांनी केला मोठा खुलासा

मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

मुंबई : अभिनेता पर्ल वी पुरी याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्यावर एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी, आता पीडितेच्या वडिलांनी मोठा खुलासा केला आहे. पर्लची ओळख त्यांच्या मुलीनेच फोटो पाहून पटवल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

यापूर्वी पीडितेच्या आईने पर्ल निर्दोष असल्याचं सांगत मुलीचा ताबा मिळवण्यासाठी पीडितेचे वडील खोटे आरोप करत असल्याचं म्हटलं होतं. परंतु, आता पीडितेच्या वडिलांनी मोठा खुलासा केला आहे. पीडितेच्या वडिलांनी एक निवेदन जाहीर करून लिहिलं की, “माझी मुलगी गेले पाच महिने तिच्या आईसोबत होती. माझ्या मुलीसोबत माझा कोणताही संपर्क नव्हता. परंतु, जेव्हा मी तिच्या शाळेत फी भरण्यासाठी गेलो तेव्हा ती येऊन मला बिलगली. ती घाबरलेली होती. तिने माझ्यासोबत घरी येण्याचा हट्ट केला. मी तिला घरी घेऊन आल्यानंतर तिने मला संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर मी पोलिसात तक्रार दाखल केली. मुलीची वैद्यकीय तपासणीदेखील करण्यात आली, त्यात हे स्पष्ट झालं की तिचं शोषण करण्यात आलं आहे.”

पीडितेच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, “मुलीचे आरोपीची ओळख त्याच्या टीव्हीवरील पात्राच्या नावाने म्हणजेच रघबीर या नावाने सांगितली. मी मालिका पाहत नसल्याने मला रघबीर कोण याची कल्पना नव्हती. त्यामुळे मी मुलीला अनेक अभिनेत्यांचे फोटो दाखवले. तेव्हा तिने फोटो पाहून आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर आम्हाला समजलं की हा अभिनेता पर्ल पुरी आहे.” त्यांनी आवाहन केले की माझ्या ५ वर्षीय मुलीला ती खोटं बोलत आहे असं म्हणणं बंद करा.

दरम्यान, पोलिस या मुलीशी बोलले आणि नंतर या मुलीचा जबाब नोंदवून घेण्यासाठी एकटीला मॅजिस्ट्रेटकडे नेण्यात आलं. तिथे 164 जबाब नोंदविण्यात आले. अगदी मॅजिस्ट्रेटसमोरही मुलीने तशीच्या तशी सर्व घटना सांगितली आणि त्याच अभिनेत्याची ओळख पटविली. मुलीने मॅजिस्ट्रेटना सांगितले की तिने तात्काळ तिच्या आईला हा प्रकार सांगितला होता.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत